वडार समाजाचे मोठे योगदान
वडार समाज कठोर परिश्रमासाठी ओळखला जातो. भारताच्या इतिहासामध्ये या समाजाचा मोलाचा वाटा आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वास्तू निर्माण करण्यामध्ये वडार समाजाचे मोठे योगदान आहे. देशातील राजे-महाराज्यांचे किल्ले, ऐतिहासिक मंदिरे, राजवाडे आणि लेण्या अशा इत्यादी वास्तू वडार समाजाने मोठ्या कलेने उभारल्या आहेत.
फक्त वास्तूच नाही तर घरातील जीवनावश्यक वस्तू तयार करण्यामध्ये या समाजाचा खारीचा वाटा आहे. या समाजातील महिलांनी पाटा-वरवंटा, उखळ, जाते, खलबत्ता अशा असंख्य वस्तू स्वतः तयार केल्या आहेत. वास्तू कला आणि आकर्षक वस्तू तयार करण्याचं ज्ञान हे वडार समाजाने जगाला दाखवून दिले आहे.
No comments:
Post a Comment