वडार हा भारताच्या महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा आणि या राज्यांत राहणारा एक समाज आहे. वड्डर समाजालाच वड्ड, वडार असेही म्हटले जाते. ही हिंदु धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओड किंवा ओड्र (Od किंवा Odra) या शब्दाचा अपभ्रंश होऊन वडार हा शब्द अस्तित्वात आला आहे. ओड्र या शब्दाचे मूळ शोधणे फार कठीण आहे. संस्कृत शब्द उंड पासून उंड्र नंतर ओड्र हा शब्द तयार झाला व पुढे ओड्र पासून ओड-ओढ-वड्ड-वडार असा विस्तार होत गेला, असा एक विचार प्रवाह आढळून येतो.
संस्कृतमध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल.
ओरिसा या राज्याच्या नांवाची उत्पत्ती ओड्र विषय (Odra-Vishaya)/ओड्रदेश या संस्कृत शब्दांपासून झालेली आहे. ओडवंशीय राजा ओड्र याने ओरिसा हे राज्य वसविले. पाली आणि संस्कृत भाषेत ओड्र लोकांचा उल्लेख क्रमशः ओद्दाक आणि ओड्रच्या रूपात आढळून येतो. प्लिनी आणि टोलेमीसारख्या युनानी लेखकांनी ओड्र लोकांचे वर्णन ओरेटस (Oretes) असा केला आहे. प्लिनीच्या प्राकृतिक इतिहासात ओरेटस (Oretes) लोक जेथे राहतात तेथे मलेउस (maleus) पर्वत उभा आहे. येथे युनानी शब्द ओरेटस बहुधा संस्कृतमधील ओड्र या शब्दाचे संस्करण असून, मलेअस पर्वत हा ओडिसामधील मलयागिरी आहे.
महाभारतात ओड्रांचा उल्लेख पोड्र, उत्कल, मेकल, कलिंग आणि आंध्र यांच्या समवेत आढळून येतो. विहिरी खणणे, सुरूंग लावून दगड फोडणे किंवा दगडाच्या खाणी पाडणे ही काम वडार समाजाची असतात.या समाजाचे तीन प्रकार पडतात. ते म्हणजे माती वडार आणि दगड वडार व गाडी वडार
वडारवाडा
https://vadarsamajvikassangh.blogspot.com/2023/07/vadar-samaj.html