Followers

Sunday, 14 July 2024

GR आहे.. आपल्या समाजामधील जे वडार बांधव आहेत. ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड अजिबात मिळालेले नाही.. अशांना तर रेशनिंग कार्ड मिळणार आहे हा जीआर मी आपणास पाठवत आहे. हा जीआर आणि आपण एक अर्ज याठिकाणी पुरवठा विभाग तहसील कार्यालय यांना द्यायचा आहे..

 GR आहे..



 आपल्या समाजामधील जे वडार बांधव आहेत.

 ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड अजिबात मिळालेले नाही..

 अशांना तर रेशनिंग कार्ड मिळणार आहे हा जीआर मी आपणास पाठवत आहे.

 हा जीआर आणि आपण एक अर्ज याठिकाणी पुरवठा विभाग तहसील कार्यालय यांना द्यायचा आहे..


 www.maharashtra.gov.in


O

Direct link



 https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions











 


Friday, 7 July 2023

Vadar samaj yogdan

 


वडार समाजाचे मोठे योगदानसंपादन करा

वडार समाज कठोर परिश्रमासाठी ओळखला जातो. भारताच्या इतिहासामध्ये या समाजाचा मोलाचा वाटा आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वास्तू निर्माण करण्यामध्ये वडार समाजाचे मोठे योगदान आहे. देशातील राजे-महाराज्यांचे किल्ले, ऐतिहासिक मंदिरे, राजवाडे आणि लेण्या अशा इत्यादी वास्तू वडार समाजाने मोठ्या कलेने उभारल्या आहेत.

फक्त वास्तूच नाही तर घरातील जीवनावश्यक वस्तू तयार करण्यामध्ये या समाजाचा खारीचा वाटा आहे. या समाजातील महिलांनी पाटा-वरवंटा, उखळ, जाते, खलबत्ता अशा असंख्य वस्तू स्वतः तयार केल्या आहेत. वास्तू कला आणि आकर्षक वस्तू तयार करण्याचं ज्ञान हे वडार समाजाने जगाला दाखवून दिले आहे.

Vadarwada

 


वडारवाडासंपादन करा

वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडा असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या गावांत बहुधा वडारवाड्या असतात. महाराष्ट्रात सोलापूरकोल्हापूर, यवतमाळ, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, लातूर, जालना येथे या समाजाची चांगली लोकसंख्या असून हा समाज स्वतःला भगीरथाचे व बजरंगाचे पूजक म्हणवतात. त्यांची बोलीभाषा तेलुगू - कानडी मिश्रित आहे.

Vadar SAMAJ

 वडार हा भारताच्या महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा आणि या राज्यांत राहणारा एक समाज आहे. वड्डर समाजालाच वड्ड, वडार असेही म्हटले जाते. ही हिंदु धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओड किंवा ओड्र (Od किंवा Odra) या शब्दाचा अपभ्रंश होऊन वडार हा शब्द अस्तित्वात आला आहे. ओड्र या शब्दाचे मूळ शोधणे फार कठीण आहे. संस्कृत शब्द उंड पासून उंड्र नंतर ओड्र हा शब्द तयार झाला व पुढे  ओड्र पासून ओड-ओढ-वड्ड-वडार असा विस्तार होत गेला, असा एक विचार प्रवाह आढळून येतो.

संस्कृतमध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा  उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल.

ओरिसा या राज्याच्या नांवाची उत्पत्ती ओड्र विषय (Odra-Vishaya)/ओड्रदेश या संस्कृत शब्दांपासून झालेली आहे. ओडवंशीय राजा ओड्र  याने ओरिसा हे राज्य वसविले. पाली आणि संस्कृत भाषेत ओड्र लोकांचा उल्लेख क्रमशः ओद्दाक आणि ओड्रच्या रूपात आढळून येतो. प्लिनी आणि टोलेमीसारख्या युनानी लेखकांनी ओड्र लोकांचे वर्णन ओरेटस (Oretes) असा केला आहे. प्लिनीच्या प्राकृतिक इतिहासात ओरेटस (Oretes) लोक जेथे राहतात तेथे मलेउस (maleus) पर्वत उभा आहे. येथे युनानी शब्द ओरेटस बहुधा संस्कृतमधील ओड्र या शब्दाचे संस्करण असून, मलेअस पर्वत हा ओडिसामधील मलयागिरी आहे.

महाभारतात ओड्रांचा उल्लेख पोड्र, उत्कल, मेकल, कलिंग आणि आंध्र यांच्या समवेत आढळून येतो. विहिरी खणणे, सुरूंग लावून दगड फोडणे किंवा दगडाच्या खाणी पाडणे ही काम वडार समाजाची असतात.या समाजाचे तीन प्रकार पडतात. ते म्हणजे माती वडार आणि दगड वडार व गाडी वडार